आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

बाळकृष्ण मधाळे
Sunday, 9 August 2020

मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. परंतु, ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका असल्याचेही आरोग्यमंत्री टाेपे यांनी स्पष्ट केले.

सातारा : मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात दावा सुरु आहे. या दाव्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. परंतु, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराड येथे स्पष्ट केले.
...उदयनराजेंनी पवार साहेबांना केला फोन : राजेश टोपे 

आराेग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (रविवार) सातारा आणि काेल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील टाऊन हाॅले येथे बैठक झाली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री टाेपे यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेतील महत्तवपुर्ण बदलाबाबतची माहिती दिली.

राजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती
 
ते म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रारंभ केला आहे. या जागांसाठी मुलाखत नसेल; पण गुणवत्तेच्या आधारावर भरती करणार आहाेत. सातारा आणि काेल्हापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात भरती केले जाईल. या भरतीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. येथे एमबीबीएस डाॅक्टर्स आहेत. त्यांना सेवेची संधी उपलब्ध आहे. 

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात दावा सुरु आहे. या दाव्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. परंतु, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात भाजपाचे राजे; राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope Says Vacant Seats Will Be Fulfilled Of Health Department