आरोग्यसेवेतील पदांची पुर्नपरिक्षा घेण्याची नामुष्की | Health Service Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam
आरोग्यसेवेतील पदांची पुर्नपरिक्षा घेण्याची नामुष्की

आरोग्यसेवेतील पदांची पुर्नपरिक्षा घेण्याची नामुष्की

पुणे - राज्यातील आरोग्य सेवा भरती वादग्रस्त निर्णयाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. भरती प्रक्रियेतील प्रचंड गोंधळामुळे आरोग्य विभागाने तब्बल १२ संवर्गांचे काही कार्यालयाअंतर्गत निकाल राखीव ठेवले असून, त्यातील दहा पदांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' आणि 'ड' साठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा पार पडल्या. प्रवेशपत्रातील त्रुटी, अस्तित्वात नसलेले परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र ना मिळणे आदी कारणांमुळे या परीक्षेला वादग्रस्ततेची किनार होती. न्यासा कम्युनिकेशन या खाजगी कंपनीने मोठ्या प्रमाणावर बेजबाबदारपणा दाखवत परीक्षा घेतल्याचे आरोप विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात आले होते. अपुऱ्या नियोजनामुळे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माध्यमांपुढे येत परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. असे असतानाही वादग्रस्त न्यासा कंपनिकडूनच परीक्षा घेण्यात आली. त्यातही मोठ्या प्रमाणावर आरोप झाले, दोन पदांसाठी तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहे. अशा संवर्गांतील भरतीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

हेही वाचा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अत्यंत वादग्रस्त असलेल्या या परीक्षेच्या निकालाबद्दल अजूनही संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच आरोग्य विभागाने बुधवारी काढलेल्या या परिपत्रकामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच सकाळने पाठपुरावा केला आहे. परीक्षा पद्धतीतील चुका, गोंधळ आणि उमेदवारांच्या समस्या वेळोवेळी मांडण्यात आले आहे.

या पदांचे निकाल राखीव (परिमंडळानुसार बदल) -

सांख्यकी अन्वेषण, प्रयोशाळा वैज्ञानिक अधिकारी कनिष्ठ लिपिक, दंत यांत्रिकी, विजतंत्री, कुशल कारागीर, कनिष्ठ तांत्रिक सहायक, अवैद्यकीय सहायक, दूरध्वनी चालक, लघु टंकलेखक

न्यायालयाची स्थगिती -

अधिपरीचारिका (५० टक्के राखीव), औषध निर्माण अधिकारी.

loading image
go to top