
वाशीम : आस्मानी संकटापुढं शेतकऱ्याची कशी हतबलता असते याचा अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण शेतकरी पावसात वाहुन जाणारा आपला शेतमाल वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. पावसाचा जोर असल्यानं वेगानं वाहणाऱ्या पाण्यावर आणि त्यात वाहून जाणाऱ्या भुईमुगाला आवरताना त्याला मोठे कष्ट करावे लागत आहेत.