राज्यात उन्हाचा चटका वाढणार; कोकण,मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस शक्य

प्रतिनिधी
मंगळवार, 19 मे 2020

विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.कोकण,मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.जळगाव येथे देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पुणे - राज्यातील पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आजपासून (ता.१९) विदर्भ मराठवाड्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढणाचा अंदाज आहे. विदर्भ आणि परिसरावर वाहणारे चक्राकार वारे, अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.८, धुळे ४२.२, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४१.४, नाशिक ३६.३, निफाड ३५.१, सांगली ३७.०, सोलापूर ४०.३, डहाणू ३४.३, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३४.९, औरंगाबाद ४०.६, परभणी ४२.४, नांदेड ४१.०, अकोला ४३.८, अमरावती ४१.४, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ३९.५, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.७, वर्धा ४०.०. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heat wave will increase in the state rain possible in Konkan Central Maharashtra