
पुणे : राज्यात उन्हाच्या झळ्या वाढू लागल्याने कमाल तापमानातील वाढ कायम आहे. सोमवारी (ता. २४) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३७.६ अंश तापमान नोंदले गेले. मंगळवारीही कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) कायम आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.