
पुणे : पावसाअभावी कमाल तापमान चाळिशीपार गेल्याने विदर्भात होरपळ वाढली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात उद्या (ता.१२) जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सावधगिरीचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.