
पुढचे दोन दिवस विदर्भ तापणार! हवामान विभागाची माहिती
उष्णतेपासून बचावासाठी देशभरात नागरीक मॉन्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहेत, या दरम्या पुढील दोन दिवस विदर्भासह देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहाणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ पुन्हा तापणार आहे. (heatwave in vidarbha-india continue for two days imd Maharashtra weather update)
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे. देशातील या भागात तापमान 40-46°C पर्यंत असते जे सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. तसेच हवामान विभागाने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याने जारी केला आहे.
येथे पावसाची शक्यता..
पुढील 48 तासांनी नैऋत्य मोसमी पावसाची (SW Monsoon) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आगमनाची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात देशात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर भारताच्या लगतच्या मैदानी भागात गडगडाटी वादळांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर, देशभरात तापमान कमी होईल आणि उष्णतेची लाट ओसरेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर
हेही वाचा: केतकी चितळे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
आज आणि उद्या उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर ही उष्णतेची लाट 16 मे पासून ते हळूहळू कमी होईल. त्यामुळे, 14 आणि 15 मे रोजी राज्यातील विदर्भात पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्यात काल 44.7 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस हेच तापमान कायाम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Web Title: Heatwave In Vidarbha India Continue For Two Days Imd Maharashtra Weather Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..