
"सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर
राज्यात हनुमान चालीसा प्रकरणी चर्चेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज दिल्लीत एका मंदीरात महाआरती केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी नवनीत राणा यांच्यावर वादग्रस्त शब्दात टीका केल्यानंतर भाजप (BJP) ने त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली.
चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे, त्या म्हणाल्या की, "डोक्यावर पडलेल्या ताई म्हणताहेत खासदार नवनीत राणा पुर्वी बार मध्ये काम करायच्या..सांभाळून बोला ..सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर सत्तेचे वांदे होतील हो…", असे म्हटले आहे. विद्या चव्हाण यांनी कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे, असे वक्तव्य केले होते.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, "महिलांना बदनाम करण्यात या माहीर.. नवनीत असतील तुमच्या विरोधक पण इतकं खालच्या पातळीवर, ते ही खोटं बोलतांना लाज कशी नाही वाटतं…", असा प्रश्न देखील त्यांनी य़ावेळी केला आहे.
हेही वाचा: केतकी चितळेवर कारवाई होणार; गृहमंत्र्यांची स्पष्टीकरण
हेही वाचा: "राणा आधी बारमध्ये..."; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य
विद्या चव्हाण काय म्हणाल्या..
नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती केली, त्यापुर्वी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणांवर टीका केली होती, त्या म्हणाल्या होत्या की, "कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो, हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय." यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
हेही वाचा: "हनुमान चलीसा म्हटलं तर कारवाई, पण.."; फडणवीसांचा आरोप
Web Title: Bjp Chitra Wagh Criticize Ncp Vidya Chavan Over Remark On Navneet Rana Hanuman Chalisa Row
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..