
Pre Monsoon: मॉन्सूनपूर्व पावसानं राज्यात सध्या चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून मराठवाड्यापर्यंत अनेक ठिकाणी बुधवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. गुरुवारी (ता. १५) मध्य महाराष्ट्र व साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
तसंच काही भागांत अतिमुसळधार पावसामुळं दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या कोकण व परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगाल ते झारखंड, विदर्भ, मराठवाडा व कर्नाटक-केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. यामुळं राज्यात मॉन्सूनपूर्व पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे.