
भिमाशंकर : बुद्ध पौर्णिमेनिमित्त दरवर्षी वनखात्याकडून प्राणीगणना आणि निसर्गानुभवासाठी निसर्गप्रेमींना आवाहन केलं जातं. यंदाही महाराष्ट्रातील विविध भागातील वनजमिनी आणि जंगलांमध्ये बौद्ध पौर्णिमेदिनी अर्थात १२ मे २०२५ रोजी प्राणीगणना पार पडली. यामध्ये पुणे वनपरिक्षेत्रातील भामाशंकर -१, ताम्हिणी, सुपे, नान्नज, रेहेकुरी, श्रीगोंदा, मिरजगाव, भिमा-२, करमाळा या वनपरिक्षेत्रात हा प्राणीगणनेचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सुमारे १०० हून अधिक निसर्गप्रेमींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यामध्ये भिमाशंकर -१ या परिक्षेत्रात सुमारे ३० निसर्गप्रेमींचा समावेश होता.