महाडमध्ये भीषण स्थिती, जीव वाचवण्यासाठी लोक बसले एसटीच्या टपावर

32 घरावर दरड कोसळून 72 जण बेपत्ता
महाडमध्ये भीषण स्थिती, जीव वाचवण्यासाठी लोक बसले एसटीच्या टपावर

महाड: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (heavy rain) कोसळत आहे. कोकणात (kokan) रायगड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, महाड (Mahad) या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी (river overflowing) भरुन वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाडमध्ये तर अक्षरक्ष: भीषण परिस्थिती आहे. लोक जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. (Heavy rain Dangerous flood situation in kokan mahad area know about it dmp82)

महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीने रौद्र रुप धारण केले आहे. महाबळेश्वर येथे धो-धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. त्यामुळे महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. महाड तालुक्यातील नाते रोडवर तळीये गावात दरड कोसळली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरावर ही दरड कोसळली असून यामध्य 72 जण बेपत्ता असल्याची माहिती समजत आहे.

महाडमध्ये भीषण स्थिती, जीव वाचवण्यासाठी लोक बसले एसटीच्या टपावर
संजय राऊत यांच्याविरोधात याचिका, हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

दरड कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जखमी किंवा जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या दुर्घटनेत अंदाजे 72 लोक बेपत्ता असल्याच सांगितलं जातं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

महाडमध्ये भीषण स्थिती, जीव वाचवण्यासाठी लोक बसले एसटीच्या टपावर
Gold : केंद्र सरकारच्या धोरणास सुवर्णकार संघटनांचा विरोध

विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माणगावमध्ये दाखल झाले आहेत. दरेकर यांच्यासोबत गिरीश महाजन आणि आमदार निरंजन डावखरे आहेत. दरेकर माणगाव टोल नाक्यापर्यंत पोहोचले. पण त्यापुढे सहाफुटापर्यंत पाणी असल्याने त्यांना पुढे जाता आलेले नाही. मदतीसाठी NDRF ची टीम माणगावमध्ये दाखल झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com