esakal | संजय राऊत यांच्याविरोधात याचिका, हायकोर्टाने निकाल ठेवला राखून
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

संजय राऊत यांच्याविरोधात याचिका, हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शिवसेनेचे खासदार (shivsena mp) संजय राऊत (sajnay raut) यांच्या विरोधात मानसोपचारतज्ज्ञ महिलेने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) निकाल राखून ठेवला आहे. पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या डॉक्टर महिलेने (doctor women) यांनी राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि पाटकर यांच्या पतीमुळे जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. याबाबत तीन फौजदारी गुन्हे दाखल केले होते. (Mumbai high court reserve verdict on petition against sanjay raut dmp82)

पण मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी या तक्रांरींवर कारवाई केली नाही, असा युक्तिवाद आज एड आभा सिंह यांनी याचिकादाराकडून केला. मनसुख हिरन हत्या आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा उल्लेख सिंह यांनी केला आणि पाटकर यांच्या जीवाला ही धोका होऊ शकतो, असा युक्तिवाद केला. दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी अहवाल दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: BMC : मिठी नदीच्या पुरावर उपाय, 'या' वर्षापर्यंत प्राथमिक अभ्यास

याचिकादार आणि राऊत यांचे नाते वडिल-मुलीसारखे आहे. जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांना पोलीस संरक्षणही दिले होते, असे एड पी के ढाकेफाळकर यांनी सांगितले. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने यावर निकाल राखून ठेवला आहे.

हेही वाचा: प्रवाशांच्या संकटकाळात 'लालपरी' धावली, पहाटे चार वाजता 'ST' चे मदतकार्य

पाटकर यांना पोलिसांनी बोगस डिग्री प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये जामीन मिळण्यासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी पाटकर यांनी आणखी एक याचिका केली आहे. सोमवारी यावर सुनावणी होणार असून याचिकेत महिलेच्या पतीला पक्षकार करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. सुनावणी होईपर्यंत महिलेला जामीन मंजूर करावा, अशी मागणी सिंह यांनी केली. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

loading image