राज्यातील ‘या’ ७२ महसूल मंडलात अतिवृष्टी! १६ महसूल मंडलात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस; अजूनही पावसाची संततधार सुरूच

राज्यातील ७२ महसूल मंडलात सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा या जिल्ह्यातील १६ महसूल मंडलात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
sakal
maharashtra-rainsolapur

सोलापूर : राज्यातील ७२ महसूल मंडलात सोमवारी (ता. १०) सकाळी आठ ते मंगळवारी (ता ११) सकाळी आठ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा या जिल्ह्यातील १६ महसूल मंडलात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

राज्यातील दुष्काळाची दाहकता पावसामुळे कमी झाली असून छोटे-मोठे तलाव तुडूंब भरले आहेत. कोरड्याठाक असलेल्या नद्यांमध्ये देखील पाणी साचले असून सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात मागील चार दिवसांत तीन टीएमसी पाणी आले आहे. मॉन्सूनने यंदा लवकरच हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून पावसाची राज्यभर जोरदार बॅटिंग सुरू आहे.

दरम्यान, २४ तासातील पाऊस किती, यावरून अतिवृष्टीचे समीकरण जुळविले जाते. २४ तासांत ६५ मिलिमीटर किंवा त्यातून अधिक पाऊस पडल्यावर अतिवृष्टी म्हणून नोंद होते. मंगळवारी देखील पाऊस सुरू असल्याने अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांची संख्या १००हून अधिक होईल. पावसाने राज्यभर हजेरी लावल्याने पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते व एसएसपी, अशा २९ लाख ५० हजार मे.टन खतांचा साठा तयार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

१०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस

  • रायगड : मुरूड, नंदगाव

  • छत्रपती संभाजी नगर : बालानगर

  • जालना : वातूर, घनसांगवी

  • लातूर : कासरखेडा, मुरूड, लांबजाना, किल्लारी, निलंगा, चाकूर, आष्टा

  • धाराशिव : शिरढोण, गोविंदपूर, नारंगवाडी

  • बुलढाणा : सिंदखेड

अतिवृष्टी झालेली ७२ मंडले

  • रत्नागिरी : आबलोली

  • जळगाव : रिंगणगाव, वाकडी, नांदरा

  • सांगली : कौलापूर

  • छत्रपती संभाजी नगर : कचनेर,बालानगर, ढोरकीन

  • जालना : राजूर, केदारखेडा, वागरूळ, परतूर, वातूर, बावणे, घनसंगावी, खु पिंपळगाव, तळणी, ढोकसाळ,

  • बीड : अंबेजागाई, घाटनंदूर, धरमपुरी, मोहखेड

  • लातूर : लातूर, बाभळगाव, हरंगूळ, कासरखेडा, मुरूड, तांदुळजा, चिंचोली, कन्हेरी, औसा, आष्टा, लांबजाना, मातोळा, धाडा, बेलकुंड, किणी, किल्लारी, निलंगा, पानचिंचोळी, मितूर, औराड, कासरबालकुंड, आंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी, हलगरा, भातमुंगली, चाकूर, नाळेगाव, रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, पळशी, शिरूर अनंतमाळ, हिसामाबाद.

  • धाराशिव : जागजी, सलगरा, इटकळ, शिरढोण, गोविंदपूर, नारंगवाडी, मूळज

  • नांदेड : कुरूळा

  • परभणी : केकरजवळा

  • बुलढाणा : देऊळगाव, तुळजापूर, सिंदखेड, हिरदाव

  • वाशीम : गोवर्धन

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी

जिल्ह्यातील मागील चार-पाच दिवसांतील पावसामुळे दुष्काळाच्या झळा कमी झाल्या आहेत. आता पेरणीसाठी पोषक वातावरण असून पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांना उडीद, सोयाबीन पेरणी करता येईल. पेरणीपूर्वी जमिनीचा वापसा जरुरी असून शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया देखील करावी आहे.

- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com