
मोखाडा : मोखाड्यात गेली चार दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने कारेगाव - करोळ रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेला आहे. गारगई नदीच्या पुलावर पाणी तुंबले तर बेलपाडा- मरकटवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे. या तिन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील नद्यांनी धोक्याच्या पातळीने ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.