राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. गुरूवारी (ता.१०) कोकणातील माथेरान येथे १२६.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

पुणे - गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. गुरूवारी (ता.१०) कोकणातील माथेरान येथे १२६.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नदीनाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले. पावसामुळे भातशेतीवरील संकट टळले आहे. मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सायकांळच्या वेळेत विजांच्या कडकडाटासह सरी कोसळत आहेत. रात्री उशिरा नगर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुसळधारेचा इशारा
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून (ता.११) मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. शनिवारी (ता.१२) राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in maharashtra state