
Rain Update
esaka
राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पिकांसकट जमीनही वाहून गेली आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पण हे संकट अजून टळलेले नाही. महाराष्ट्रासाठी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते पश्चिमेकडे सरकणार आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस होईल. २७ ते २९ सप्टेंबर हा काळ सर्वाधिक तीव्रतेचा राहणार आहे.