esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

farm

शेतीपिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

वसमत : अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) वसमत मतदारसंघात झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी पंचनामे करुन आर्थिक मदत (funding) मिळवून द्यावी अशी मागणी आमदार राजू नवघरे यांनी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची भेट घेऊन केली. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी लगेच होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: मुंबई : तीन सदस्यांचाच प्रभाग

वसमत तालुक्यात अतिवृष्टीने कापूस, ज्वारी, तूर व सोयाबिन पिकाला जाग्यावरच कोंबे फुटू लागली आहेत. तर ऊस पिकाला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी या नैसर्गिक संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. तसेच वसमत शहरात व ग्रामीण भागात अतिवृष्टी मुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरुन घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून नुकसान झाले आहे.

आमदार राजू नवघरे यांनी मंगळवारी ता.२८ मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे वसमत-औंढा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची विनंती केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा करण्याचे आश्वासन आमदार राजू नवघरे यांना दिले.

loading image
go to top