esakal | IMD : दोन दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

IMD : दोन दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार

IMD : दोन दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सोमवारी रात्री साठेआठ वाजेपर्यंत शहरात ३. ५ मिलिमीटर तर लोहगाव येथे ९.२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर पुढील दोन दिवस शहरात पावसाचा जोर वाढेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दिवसभर ऊन आणि रात्री पाऊस असे चित्र सध्या पुण्यात दिसून येत आहे. रविवारी (ता. ५) मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी दुपारनंतर शहरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्हयात येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १०) आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी (ता. ७) आणि बुधवारी (ता. ८) शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. तसेच घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी दिली.

 राज्यात पावसाचा जोर वाढला :

राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी (ता. ७) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद महाबळेश्‍वर येथे १६.९ अंश सेल्सिअस इतकी झाली.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडला लगाम; टीम इंडियानं वसूल केला 'लगान'

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा आता दक्षिणेकडे आहे. तसेच उत्तर आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागर आणि उत्तर आंध्रप्रदेश ते दक्षिण ओडिशा किनार पट्टीलगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तर येत्या दोन दिवसात या चक्राकार वाऱ्यांचा प्रवास हा मध्य भाराताच्या दिशेने होणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा: 'कोविशिल्ड'चा दुसरा डोस चार आठवड्यात द्या; हायकोर्टाचे केंद्राला आदेश

या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

मंगळवार : नाशिक, पालघर, औरंगाबाद, जालना ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर

बुधवार : नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर

loading image
go to top