
"Rescue teams work in flood-affected areas as heavy rains batter North Maharashtra and Marathwada."
Sakal
नाशिक/छत्रपती संभाजीनगर : उत्तर महाराष्ट्रात रविवारी झालेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने खरिपाची दाणादाण उडाली आहे. मका, ज्वारी, कपाशी, सोयाबिन या पिकांसह भाताची मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. मराठवाड्यातही बीड, नांदेड येथे आज पावसाचा जोर कायम राहिला. राज्याच्या इतर अनेक भागांमध्ये पावसाने आज बऱ्यापैकी उघडीप दिली असली तरी धरणांतून विसर्ग सुरू असल्याने अहिल्यानगर, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, सांगली येथे पूरस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतरांनी आजही विविध ठिकाणी पूरस्थितीचा आढावा घेतला.