esakal | राज्यात पुढील ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

राज्यात पुढील ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता - IMD

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अरबी समुद्रात असलेल्या आणि बंगालच्या खाडीत होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष करून कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. (Heavy rains expected in next 48 hours in the state aau85)

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरपण येणाऱ्या वाऱ्याचा वेग जास्त असून, त्यांनी सोबत आणलेल्या ढगांमुळे राज्यात शुक्रवार (ता.२३) बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. कोल्हापुर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडला गुरुवारी (ता.२२) जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार (ता.२५) नंतर मात्र हा पाऊस कमी होत जाईल. विदर्भातही पुढील ४८ तासात जोरदार ते अतीजोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी वर्तवली आहे. हा संपूर्ण आठवडा तरी राज्यात पावसाची कृपा असेल असे दिसतेय.

पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस

पुणे जिल्ह्यात विशेष करून घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शहरात मात्र आकाश दिवसभर ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा जास्त राहील, तसेच त्यामुळे तुरळक ठिकाण जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बाहेर फिरताना काळजी घ्या

पुढील ४८ तासात कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अशा ठिकाणी फिरायला जाताना शक्यतो टाळावेच, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुणे-मुंबई दृतगतीमार्गावर धुके सदृश स्थिती जास्त काळ राहील. तसेच जिथे सातत्याने पाऊस पडतो तेथे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

पुणे शहरातील पाऊस

(संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत)

ठिकाणी : पाऊस (मिलिमीटर)

पुणे : ३.८

पाषाण : ४.२

लोहगाव : १

loading image