esakal | नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!
sakal

बोलून बातमी शोधा

tree fell on a vehicle

नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : वणी - नाशिक रस्त्यावर वलखेड फाट्याजवळ फॉर्च्यून कंपनीच्या समोर रस्त्यावर पावसात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वाळलेले झाड ईरटीका गाडी वर कोसळले. दरम्यान या गाडीत बसलेल्या तीन शिक्षकांचा घटनेत जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय 51), रामजी देवराम भोये (वय 49), नितीन सोमा तायडे (वय 32) राहणार रासबिहारी लिंक रोड नाशिक मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे आणण्यात आले असून हे सर्व जण सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगून येथे शिक्षक असून रोज अप-डाऊन करतात. याबाबत अधिक तपास दिंडोरी पाेलिस करीत आहेत.

हेही वाचा: इगतपुरी, घोटीत सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

आज सुट्टीचा दिवस असताना आगामी बारावीचा निकाल तयार करण्यासाठी नाशिकहून अलंगूनला गेले होते. आज सायंकाळी पाच वाजता पाऊस चालू पावसातच अलंगून येथून शाळेतून नासिककडे हे शिक्षक घरी जात असताना ही घटना घडली आहे. वलखेड फाट्याजवळ फाॅरच्युन कंपनी जवळ उजव्या बाजूला एक जुनाट वाळलेले झाड उभे होते. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे वाळलेले झाड सायंकाळी पाच वाजता रस्त्यावर पडले. दरम्यान त्याच वेळी या शिक्षकांची मारुती आर्टिका गाडी (MH15/FN0997) वर ते कोसळल्यानेतिघांचा मृत्यू झाला. पुढच्या सिटवर बसलेले किरकोळ जखमा झाल्या आहेत.

(Three teachers killed when a tree fell on a vehicle at Wani Nashik Road)

हेही वाचा: अनुकंपाच्या नियुक्तींसाठी ऑगस्टमध्ये शिक्षण दरबार : बच्चू कडू

loading image