राज्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर; 'या' भागात अतिमुसळधारेचा इशारा

हवामान शास्त्रज्ञ होसाळीकर यांनी पावसाचं बुलेटिन जाहीर केलं आहे.
rain update
rain updateesakal

पुणे : राज्यात मॉन्सूनाचा प्रवास काहीसा मंदावला आहे. त्यामुळं अजूनही पावसाला म्हणावी अशी सुरुवात झालेली नाही. पण येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावासाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच आजपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही त्यांनी सांगितली आहे. (Heavy rains in Maharashtra from today may heavy rain happened in some places IMD)

होसाळीकर यांनी सांगितलं की, १८ जून पासून अर्थात आजपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आणि दक्षिण कोकणात सोमवार पासून अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पेरण्या खोळंबल्या

मॉन्सूनच्या पावसावर राज्यातील शेतकरी अवलंबून असतो, पाऊस झाला की शेतकरी पेरणी करतात मात्र आवश्यक तितक्या प्रमाणात अजूनही पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी अजूनही पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहात आहेत. कृषी विभागानं शेतकर्‍यांना १०० से.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असं आवाहन केलं आहे. त्या सोबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन शेतकर्‍यांना केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com