आरटीओतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती, परिवहन आयुक्तांचे आदेश

प्रशांत कांबळे
Sunday, 10 January 2021

दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढली आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करने अनिवार्य आहे.

मुंबई: दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढली आहे. तर अपघाती मृत्यूच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे आधी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करने अनिवार्य आहे. त्यामुळे राज्यातील 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात गेल्या वर्षभरात 44 टक्के अपघात ओव्हरस्पीडने झाले आहे. तर वर्षभरात 13 हजारच्या जळपास अपघाती मृत्यू झाले आहे. राज्य महामार्गावर दुचाकी, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांचा नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरने आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वयमं शिस्त पाळण्याची गरज असल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, स्वयमं शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागापासून सुरू करणार असून, रस्ता सुरक्षा अभियांनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचा उपक्रम आयुक्तांनी हाती घेतला आहे. त्याशिवाय तसा प्रस्तावच राज्य सरकारला पाठवून शासकीय, निमशासकीय कार्यालयापासून हेल्मेट सक्ती करण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल

राज्यभरातील आरटीओ कार्यलयात वाहनाच्या विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सुद्धा हेल्मेट वापरने अनिवार्य राहणार आहे. हेल्मेट शिवाय त्यांनाही आरटीओ कार्यलयाच्या आवारात प्रवेश देण्यात येणार नसल्याने, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना यामध्ये परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Helmet compulsory RTO employees orders Transport Commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmet compulsory RTO employees orders Transport Commissioner