Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwaresakal

नागपूरः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने प्रचाराच्या रणधुमाळीत वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांची हत्या कसाबकडून नव्हे तर पोलिसांकडून झाली होती, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवारांच्या या वादग्रस्त विधानामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या नागपुरातील घराबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. काँग्रेसचे लोक देशाच्या न्यायालयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तान म्हणत होता कसाबने गोळी चालवली नाही, अपराध केला नाही, स्फोट केला नाही.. नंतर आंतरराष्ट्रीय प्रेशर आलं आणि पाकिस्तानने कसाबचे गुन्हे कबुल केले.

Vijay Wadettiwar
LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

''परंतु काँग्रेसचा नेता म्हणतो कसाबने करकरेंना मारलं नाही.. हे लोक शहिदांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांची औकात दाखवली पाहिजे. देशात २००८ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचं सरकार राज्यात आणि देशात होतं, तेव्हा झोपले होते का?'' असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com