औरंगाबाद : जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

धरण परिसरात पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे. 

औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे. 

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच 90 टक्के भरले आहे. त्यानंतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, आता पर्यटकांना धरणाच्या भिंतीवर जाण्यापासून रोखण्यात आले असून, पर्यटकांना बंदी आहे.

तसेच विद्युत रोषणाई काढण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला. परिसरात 12 सशस्त्र पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Alert Issued in Jayakwadi Dam