RTE Admission : आरटीईच्या एक किमी अटीला उच्च न्यायालयाची स्थगिती; प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

राज्यात गेल्या शैक्षणिक वर्षात आरटीईसाठी सुमारे तीन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. मात्र यंदा एक किलोमीटर अटीमुळे अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.
mumbai high court

mumbai high court

sakal

Updated on

पुणे - आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत लागू केलेली घरापासून एक किलोमीटर अंतरातील शाळांपुरतीच मर्यादा उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अटीवर आक्षेप घेत राज्य सरकारला सुधारित प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार असून प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com