
ST Workers Death : ‘दुखवटा हा अनिश्चित काळासाठी असू शकत नाही’
एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST workers agitation) पुकारले होते. हे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन सरकारकडून वेळोवेळी करण्यात आले. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम होते. आंदोलनाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांचा जीव गेला तर काहींनी आत्महत्या केली. आत्महत्येचे (suicide) आणि मृत्यूचे (death) दुखः स्वाभाविक (Sadness) आहे. मात्र, हा दुखवटा अनिश्चित काळासाठी असू शकत नाही, असा निर्णय हायकोर्टाने (High Court) दिला.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन जवळपास ५४ दिवस चालले. यावेळी राज्य सरकारने अनेकदा कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. कारवाईचा धाकही दाखवला. अनेक कर्मचाऱ्यांना निलंबितही केले. मात्र, कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
एसटीचे विलीनीकरण व्हावे (ST workers agitation) यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात काहींचा मृत्यूही झाला. आंदोलनाचा काळात काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तरी आंदोलन सुरूच होते. कोर्टाने फटकारल्यानंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम होते. यामुळे हे आंदोलन चिघळेल असेच वाटत होते. मात्र, सरकारने काही अटी मान्य केल्यानंतर तब्ब्ल ५४ दिवसांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
मात्र, काही ठिकाणी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. आंदोलनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे (suicide), सहकाऱ्यांच्या मृत्यूचे दुख: (death) होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी कामगारांनी दुखवटा पाळणेही योग्य आणि नैसर्गिक आहे. मात्र, हा दुखवटा अनिश्चित काळासाठी असू शकत नाही. यातून बाहेर येणे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे हायकोर्टाने (High Court) म्हटले आहे.