Hindi Bhasha Morcha: हिंदी सक्तीविरोधात भाजप पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा; डोंबिवली पाठोपाठ दिव्यात पक्षाला धक्का

Local BJP Leaders Resign in Dombivli and Diva Amidst Anti-Hindi Imposition Movement: डोंबिवलीमध्ये पक्ष नेतृत्व सहकार्य करत नसल्याचे बोलत दोन माजी नगरसेवकानी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला.
mns morcha
mns morchaesakal
Updated on

डोंबिवली: इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात रणशिंग फुंकले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही राज यांच्या सोबत उभे राहिले असून मराठी बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा देत मराठी भाषेसाठी मनसेचा हात धरला आहे. भाजपाचे दिवा मंडळाचे कायदा सेल संयोजक ऍड. रविराज बोटले यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. 5 जुलैला ते मोर्चात कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे डोंबिवली नंतर दिव्यातून भाजपला हा दुसरा धक्का बसला असून भाजपला घरचा आहेर मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com