
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी भाषेबाबत शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामागे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकजुटीने निर्माण केलेला दबाव आणि मराठी अस्मितेचा मुद्दा कारणीभूत ठरला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर राजकीय परिणाम होण्याची शक्यता होती. हिंदी भाषा जीआर रद्द झाला नसता तर त्याचे राजकीय परिणाम आणि भविष्यातील शक्यता यांचा सविस्तर आढावा घेऊया.