मुंबई - राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीचा विषय कुठेही सक्तीचा करण्यात आला नाही. तो ऐच्छिक ठेवला आहे. विद्यार्थ्यांना त्यासाठीची कोणतेही पुस्तक लादले जाणार नाहीत, मात्र, त्यांना इतरही भाषिक कौशल्य शिकावे यासाठी हिंदीसह इतर भाषेतून मौखिक, चित्रे दाखवून आनंददायी अथवा खेळत-बागडत, बडबड गीतांच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी हित लक्षात घेण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितले.