
राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक; हिंदु महासंघाची टीका
पुणे : मशिदींवरील भोंगे उतरण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आक्रमक भूमिकेवर हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक असल्याची टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे हिंदूंवरच बंधनं येतील असे महासंघाने म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे हिंदू जननायक नसून सेक्युलर जननायक असल्याचे हिंदू महासंघाचे आनंद दवेंनी (Anand Dave) म्हटले आहे. (Hindu Mahasangha Criticize Raj Thackeray )
हेही वाचा: 'सर्वज्ञानी संपादक जी' म्हणत चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा
दवे म्हणाले की, मंदिरातील काकड आरती, गणेशोत्सव, शिवजयंती, गावच्या यात्रा, दहीहंडी असे सारेच उत्सव यामुळे धोक्यात येतील. भोंगे उतरवण्याच्या या भूमिकेमुळे हिंदूंचे नुकसान होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंगे आधी मग मंदिरावरील भोंगे उतरवू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने सर्वाधिक कोंडी हिंदूच्या मंदिरांची झाल्याचेही मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा: "मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत आहे?"; पाहा व्हिडिओ
राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात कठोर भूमिका घेत 3 मे पर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी मनसेतर्फे ज्या ज्या ठिकाणी मशिदींवर अजान वाजत होती त्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Web Title: Hindu Mahasabha Anand Dave Criticize Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..