Prakash Ambedkar: औरंगजेबाच्या कबरीवर जाणं आंबेडकरांना भोवणार? हिंदू महासंघाकडुन अटक करण्याची मागणी

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे औरंजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarEsakal
Updated on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. आंबेडकरांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांच्या या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तर या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना कबरीवर जाणं भोवणार असल्याचं चित्र आहे. हिंदुत्ववादी संघटनेने आंबेडकरांवर कारवाई करण्याची मागणी करून चांगलीच कोंडी केली आहे.(Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : 'औरंगजेबच्या कबरीला फुलं वाहण्यामागे आंबेडकरांची भूमिका काय?' शिवसेनेने उपस्थित केला सवाल

प्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या प्रकरणावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर यांनी माथा टेकून शिवभक्तांना दुखावलं आहे. त्यांनी शिवभक्तांच्या शिवभक्तीला आव्हानच दिलं आहे, असं हिंदू महासंघ मानतो असं हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Aurangzeb : 'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

तर राज्यातील वातावरण बिघडण्याआधी, शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक सुद्धा करावी अशी आमची भावना आहे, असं हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.