

Maharashtra Earthquake
esakal
Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण परिसर मध्यरात्री भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरला. गुरुवारी(१ जुलै) मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) मापकावर ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा आणि जलालदाभा परिसरात होता.