esakal | हिंगोलीतील वीस मंडळांत अतिवृष्टी - hingoli
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

हिंगोलीतील वीस मंडळांत अतिवृष्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात चोवीस तासात ६५.३० मिलिमीटर पाऊस झाला. तालुका निहाय झालेला पाऊस हिंगोली तालुका ७९.३० मिलीमीटर, कळमनुरी ७८.८०, वसमत ७६.१०, औंढा ५६.२० तर सेनगाव तालुक्यात २८.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण ६५ ३० तर आजपर्यंत १३० ३० टक्के पाऊस झाला आहे. मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे जिल्ह्यात विस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

हेही वाचा: कोरोना नियंत्रण ठेवण्यात धारावी आघाडीवर; 19 वेळा शून्य रुग्णांची नोंद

हिंगोली मंडळात ८६ मिलिमीटर, नर्सी ५५.५ मिलिमीटर, बासंबा ७६.८ मिलिमीटर, डिग्रस ७८.५, माळहिवरा ८४.४, खांबाळा ६९.५ तर एकूण ७९ ३ मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात ४४ ३ मिलिमीटर, वाकोडी ५०, नांदापुर ६५, बाळापूर ९३ ३, डोंगरकडा ८१ ३, वारंगा १३८.८ एकुण ७८.८ मिलीमीटर पाऊस झाला.

वसमत मंडळात ९२ ३ मिलिमीटर, आंबा ६७.८, हयातनगर ९५ ३, गिरगाव ६९, हट्टा ६६.५, टेंभूर्णी ९०, कुरुंदा ५१.८ एकूण ७६ १ मिलीमीटर पाऊस झाला. औढा मंडळात ५२. ५ मिलिमीटर येहळेगाव ७०.८, साळणा ४४, जवळा ५७.५, एकूण ५६.२ मिलिमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात १८.३ मिलिमीटर, गोरेगाव ३८.५, आजेगाव ३१, साखरा १६.८, पानकनेरगाव २७ ३, हत्ता ४१ ५ एकूण २८.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

loading image
go to top