

hiroji indulkar descendants life today situation now
esakal
हिरोजी इंदुलकर हे केवळ एक कारागीर नव्हते तर ते स्वराज्याचे मुख्य वास्तुविशारद आणि इंजिनिअर होते. रायगडाची उभारणी करताना त्यांनी केवळ दगड-मातीचा वापर केला नाही, तर त्यात दूरदृष्टी ओतली. गडावरील बाजारपेठ, राजवाडा, राणीवसा, पाणी आणि अनेक गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने नियोजित केले की, शत्रूने वेढा घातला तरी गडावर पाण्याची कमतरता भासू नये. आजही रायगडावरील 'नगारखाना' अशा पद्धतीने बनवला आहे की तिथे कुजबुजलेले देखील सिंहासनापर्यंत ऐकू जाते, हा हिरोजींच्या ध्वनीशास्त्रातील ज्ञानाचा जिवंत पुरावा आहे.