
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १४८ वा दीक्षान्त संचलन सोहळा आज महिला छात्रांच्या सहभागामुळे ऐतिहासिक ठरला. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘कदम कदम बढाए जा’च्या तालावर धीरे चाल करत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी पार करत तीन वर्षांचे कठीण लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.