आंधळीत ५० ऐतिहासिक वीरगळांचा शोध, १६व्या-१७व्या शतकातील शिल्पांमधून तत्कालीन युद्धसंस्कृतीचे दर्शन

Historical Veergalas Found In Gadchiroli: आंधळीत ५० ऐतिहासिक वीरगळांचा शोध लागला आहे. १६व्या आणि १७व्या शतकातील या शिल्पांमधून तत्कालीन युद्धसंस्कृती, योद्ध्यांचा पराक्रम आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडत आहे.
Historical Veergalas Found In Gadchiroli

Historical Veergalas Found In Gadchiroli

ESakal

Updated on: 

कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारशावर प्रकाश टाकणाऱ्या संशोधन मोहिमेत कुरखेडा तालुक्यातील आंधळी गावाजवळील घनदाट जंगलात १६व्या आणि १७व्या शतकातील सुमारे ५० वीरगळांचा शोध लागला आहे. पुरातत्त्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी ही मोहीम राबविली. नंदकिशोर नैताम आणि रमेश कोरचा यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. या वीरगळांपैकी काही भग्नावस्थेत, तर काही सुस्थितीत असून, नैसर्गिक झीज सहन करीत आजही तत्कालीन इतिहासाची साक्ष देत आहेत.

Loading content, please wait...