SSC Result 2022: कमी मार्क पडलेत? पेपर कसा कराल रिचेक?

समाधानकारक मार्क पडले नसतील किंवा शंका असेल तर खालील प्रक्रियेद्वारे पेपर रिचेक किंवा झेरॉक्स कॉपी घेऊ शकता.
 Maharashtra SSC HSC Results News
Maharashtra SSC HSC Results Newssakal

Maharashtra Board SSC Result 2022: महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या लागणार आहे. यासंबंधीचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची धकधक वाढली असून महाराष्ट्रभरातील तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यातील निकाल लागणार आहे.

(How To Recheck Paper)

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली आहे. उद्या हा निकाल लागणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

 Maharashtra SSC HSC Results News
Maharashtra SSC Result: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले असतील किंवा ज्यांना आपला पेपर रिचेक करायचा असेल तर त्यांना फॉर्म भरून रिचेक करता येणार आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात समाधानकारक मार्क पडले नसतील अशा विद्यार्थांना त्या विषयाची पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी खालील प्रक्रियेनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

रिचेकिंगसाठी काय करावे?

आपल्याला जास्त लिहून कमी मार्क पडल्याची शंका असल्यास पेपर परत चेक करता येतो. त्यासाठी आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या विषयाच्या गुण परत चेक करायचे आहेत अशा विषयाचा फॉर्म शाळेतील शिक्षकांकडून मागवून घेऊन तो बोर्डात भरायचा आहे. आपण याद्वारे आपल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेऊ शकतो. त्यासाठी काही शुल्क परीक्षा बोर्डाकडून आकारण्यात येत असतात. यासाठी शाळेतील शिक्षकांचे सहकार्य घ्यावे.

 Maharashtra SSC HSC Results News
दहावीचा निकाल आज नाही, शिक्षणमंत्री लवकरच जाहीर करणार तारीख

पुन्हा परीक्षा देण्यासाठी काय करावे?

जर आपल्याला एखाद्या विषयात कमी गुण पडले असतील किंवा एखाद्या विषयात नापास झाले असतील तर त्या विषयाची पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी आपल्या शाळेत शिक्षकांकडून फॉर्म पुरवण्यात येतात. तो भरून त्यासाठीचे शुल्क भरून शिक्षकांकडे जमा करावे लागणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या शाळेतील शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com