Holi 2023 : रंगपंचमी खेळताना smartphone आणि gadget कसे सांभाळावे? भारी टिप्स

होळीचा सण म्हणजे रंगांचा सण
Holi 2023
Holi 2023esakal

Holi 2023 : होळीचा सण म्हणजे रंगांचा सण ! संपूर्ण भारत देश आपल्या मित्र आणि कुटुंबासह या सणाचा आनंद घेतो. पण होळी 2023 खेळण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवा की होळी खेळताना तुम्ही तुमच्या गॅजेट्स जसे की स्मार्टफोन, इअरबड्स आणि स्मार्टवॉच इत्यादींचीही काळजी घेतली पाहिजे , अन्यथा तुमचे तेच गॅजेट्स होळीमध्ये रंग किंवा पाण्यामुळे खराब होऊ शकतात.

Holi 2023
Holi Recipe: होळी स्पेशल कटाची आमटी कशी तयार करतात?

पाणी पडल्यास कोणतीही कंपनी वॉरंटी क्लेम देत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला होळीमध्‍ये रंग आणि पाणी या दोन्हीपासून हे सर्व गॅजेट कसे वाचवू शकता याबद्दल माहिती देणार आहोत.

Holi 2023
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

1. फोन-गॅजेट्ससाठी ही महत्त्वाची गोष्ट खरेदी करा:

होळी खेळताना तुमचा फोन, घड्याळ किंवा इअरबड्स खराब होणार नाहीत याची काळजी घ्या, यासाठी आम्ही तुम्हाला तुमचा फोन किंवा इतर गॅझेट झिप लॉक बॅगमध्ये ठेवण्याचा सल्ला देतो . तुम्हाला या बॅग ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोअरमध्ये सहज मिळतील.

2. जर फोन ओला झाला असेल तर चुकूनही हे काम करू नका :

चुकूनही तुमचा फोन खूप ओला झाला असेल, तर तो पूर्णपणे कोरडा होईपर्यंत फोन चार्जिंगवर ठेवण्याची चूक करू नका. जर तुम्ही असे काही केले तर तुमचा फोन पूर्णपणे खराब होऊ शकतो.

Holi 2023
Electricity Bill : ऑनलाईन लाईट बिल भरायची भीती वाटते ? अशी घ्या काळजी

3. या ठिकाणांहून फोनमध्ये पाणी येऊ शकते:

तुमच्या फोनमध्ये उघडे असलेल्या ठिकाणाहून रंग आणि पाणी सहज प्रवेश करू शकतात जसे की पोर्ट, इअरपीस, हेडफोन जॅक, माइक आणि स्पीकर ग्रिल इ. ज्यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की हे उघडे पोर्ट टॅपने झाकून ठेवा आणि फोन व्हायब्रेट मोडवर ठेवा जेणेकरून स्पीकर टॅप केल्यानंतर कोणत्याही प्रकारे खराब होणार नाहीत.

Holi 2023
Breast Health : स्तनांबद्दलचे हे गैरसमज आत्ताच दूर करा

4. फोनसोबत ही चूक करू नका:

अनेकदा लोक फोन ओला झाल्यावर हेअर ड्रायर वापरण्याची चूक करतात. मात्र असे करू नये कारण फोनवर गरम हवा फुंकल्याने तुमच्या फोनचे नाजूक भाग खराब होऊ शकतात.

5. स्मार्टवॉचसाठी प्रोटेक्टिव्ह केस वापरा:

तुम्ही होळीच्या पार्टीला घड्याळ घालणार असाल, तर घड्याळासाठी प्रोटेकटीव्ह कव्हर अगोदरच खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे घड्याळ जरी IP68 रेटिंगसह येत असले तरी काही केमिकल रंग तुमच्या घड्याळाचे नुकसान करू शकतात. जर तुम्हाला प्रोटेक्टिव्ह केस मिळत नसेल तर तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com