गृह विभागाचा मोठा निर्णय! ‘कॉन्स्टेबल’ही करणार आता गुन्ह्यांचा तपास; सोलापुरातील १२० अंमलदारांच्या बदल्या; बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आयुक्तांचे आदेश

ज्यांची सेवा सात वर्षे झाली आहे, जे अंमलदार पदवीधर आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय किंवा खात्याअंतर्गत चौकशी प्रलंबित नाही, अशा कॉन्स्टेबलला आता गुन्ह्यांचा तपास करता येणार आहे. नाईक पद रद्द झाल्यानंतर गुन्ह्यांच्या तपासाचे हवालदारांवरील ओझे वाढले होते.
police
policesakal
Updated on

सोलापूर : शहर पोलिस दलातील १२० अंमलदारांच्या गुरुवारी (ता. १५) अंतर्गत बदल्या झाल्या. त्यामध्ये श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सहा तर १७ सहायक पोलिस उपनिरीक्षक आहेत. बदली झालेल्यांनी सध्याच्या ठिकाणावरून तत्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहावे, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत.

अंतर्गत बदली झालेल्यांमधील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील आठजणांना सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर २२ अंमलदारांना संबंधित पोलिस ठाणे किंवा विभागातील रिक्तपदांची संख्या पाहून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय या बदल्यांमध्ये १२० पैकी सहा जणांना सलगर वस्ती पोलिस ठाणे, १३ जणांची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली आहे. तसेच सहा जणांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, सहा जणांची विजापूर नाका पोलिस ठाण्यात, प्रत्येकी चार अंमलदारांची बदली फौजदार चावडी, जेलरोड आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याशिवाय काही अंमलदारांच्या बदल्या अतिक्रमण विभाग, मोटार परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, दंगा नियंत्रण कक्ष, सायबर पोलिस ठाणे, बॉम्बशोधक पथक, महिला सुरक्षा कक्ष, कन्वेक्शन सेल, गुन्हे शाखा, वाचक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नियंत्रण कक्ष अशा ठिकाणी करण्यात आल्या आहेत.

गुन्ह्यांचा तपास आता कॉन्स्टेबलकडेही

ज्यांची सेवा सात वर्षे झाली आहे, जे अंमलदार पदवीधर आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय किंवा खात्याअंतर्गत चौकशी प्रलंबित नाही, अशा कॉन्स्टेबलला आता गुन्ह्यांचा तपास करता येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश गृह विभागाने काढले आहेत. नाईक पद रद्द झाल्यानंतर गुन्ह्यांच्या तपासाचे हवालदारांवरील ओझे वाढले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीधर व सात वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कॉन्स्टेबलचे नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात सहा आठवड्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याठिकाणची परीक्षा पात्र होण्याचे बंधन आहे. त्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्यांचा तपास सोपविला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com