
महाराष्ट्रात 288 आमदार निवडून आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सत्तेत येतात. सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करा या मागणीसाठी बुधवारी तारीख 4 सकाळी राजुरी येथील टेंभुर्णी रोडवरील मोबाईल टॉवर एक होमगार्ड चढला असून जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात घेत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्र त्याने घेतला.
सदाशिव सांडू ढाकणे असे त्या होमगार्डचे नाव असून तो राजूर येथे कार्यरत असल्याचे समजते. त्याने सोबत विषयाची पुढे देखील घेतली असून मला कोणी बळजबरी केल्यास किंवा खाली उतरवण्याचा प्रयत्न केल्यास मी विष घेऊन आत्महत्या करेल असा इशारा देखील त्याने दिला आहे.