अमरावती: दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षड्यंत्र: संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut

अमरावती: दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षड्यंत्र: संजय राऊत

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचं चित्र आहे. गाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

संजय राऊत यांनी म्हटलंय की, ईडी, एसीबी, सीबीआय वापरुनही राज्य अस्थिर होत नसल्याचं पाहून हे दंगलीचं कारस्थान रचलं जात आहे. भाजप धार्मिक द्वेष, जातीय दंगली घडवल्याशिवाय राजकारण करुच शकत नाही. तेच इथे दिसून येतंय. ज्या संघटनेकडून हे घडतंय तिची ताकद तेवढी नाहीच आहे. मुस्लिम समाजात तेवढा पाठिंबा नसून ही रजा अकादमी ही संघटना भाजपची बहिण संघटना मानली जाते, असं त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, दंगली घडवून अस्थिर करण्याचं हे कारस्थान आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, राज्यपालांना भेटायचं आणि मग गृहखात्याकडे जायचं आणि मग राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची, असा हा नेहमीचा विरोधकांचा खेळ आहे. मराठवाड्यात हे प्रामुख्याने घडत असून ठरवून सुरु आहे. विरोधकांनी हे मुद्दामपणे करु नये. महाराष्ट्राचे शत्रू बनू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन

पुढे ते म्हणाले की, दंगलखोर पकडले जातीलच, त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओढला जाईल आणि खरे चेहरे लवकरच उघडे होतील, असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठं कारस्थान असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.

काय घडतंय अमरावतीमध्ये?

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण घेत असल्याचं दिसत आहे. भाजपने बंदचं आवाहन केलं होतं. यामध्ये काही गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसत आहे. जे रस्त्यात दिसत आहे त्याला बंद करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून सुरु आहेत. आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु असून त्यांच्या हातात काठ्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

loading image
go to top