Aadhaar at Birth : ‘आधार अ‍ॅट बर्थ’ योजनेत रुग्णालये अनुत्तीर्ण;नागपूर जिल्ह्यात दोन वर्षांत दीड लाख जन्म

नवजात बालकांच्या जन्मानंतर त्यांची नोंद सरकारी दस्तऐवजात येईपर्यंत त्यांचे पाच वर्षे उलटून जाते. पुढे मुला-मुलींचे नाव किंवा आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख यात घोळ होण्याची भीती असते.
Aadhaar at Birth
Aadhaar at Birth sakal
Updated on

नागपूर : नवजात बालकांच्या जन्मानंतर त्यांची नोंद सरकारी दस्तऐवजात येईपर्यंत त्यांचे पाच वर्षे उलटून जाते. पुढे मुला-मुलींचे नाव किंवा आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख यात घोळ होण्याची भीती असते. भविष्यातील त्रासापासून मुक्ती मिळावी, या हेतूने बाळ जन्माला येताच जन्मदाखल्याबरोबर ‘आधार अ‍ॅट बर्थ’ अर्थात आधार क्रमांक नोंदणीचा आदेश सरकारने जारी केला. पण जन्मतः आधार नोंदणी योजनेत सर्वच रुग्णालये अनुत्तीर्ण झाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात दोन वर्षांत सुमारे दीड लाख बाळेजन्माला आली. मात्र केवळ दहा हजार २८८ बालकांची जन्माच्या वेळी आधारकार्डासाठी नोंदणी पूर्ण झाली. केवळ आठ टक्के बाळांची जन्मतः आधार नोंदणी झाल्याने सरकारच्या योजनेत सर्वच रुग्णालये नोंदणी करण्यात अनुत्तीर्ण झाली आहे. सरकारच्या सूचनेनुसार राज्यभरातच जन्मत: बाळाचे ‘आधार अ‍ॅट बर्थ’ काढण्याची योजना सुरू झाल्यानंतर बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या बाळाची आधारकार्ड नोंदणी झाली.

यानंतर नागपुरात ‘मेयो’, ‘मेडिकल’, ‘डागा’सह नागपूर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधारकार्डसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला गेला. नागपूर जिल्‍ह्यात दररोज सुमारे २०० चिमुकल्याचा जन्म होत असून त्यांची आधार नोंदणी होणे आवश्यक आहे. मात्र दोन वर्षांत ‘मेडिकल’मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार २८८ जन्मत: बालकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. जन्मत: बालकांचे आधार नोंदणी करण्यात इतर रुग्णालयांच्या तुलनेत ‘मेडिकल’ आघाडीवर आहे.

अशी होते नोंदणी...

  • रुग्णालयात बाळाचा जन्म होताच रुग्णालय प्रशासनाकडून टपाल कार्यालय किंवा उपलब्ध कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाते

  • रुग्णालय प्रशासनाकडून जन्माचा दाखला तयार केला जातो

  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकांच्या आधारकार्ड क्रमांकासह इतर महत्त्वाच्या प्रक्रिया टपाल कार्यालयाकडून पूर्ण केल्या जातात

  • माहितीची पडताळणी केल्यानंतर पालकांच्या मोबाईलवर संदेश येतो

  • यशस्वी नोंदणीची पावती मुलाच्या आईला दिली जाते

  • दोन महिन्यात आधारकार्ड घरपोच येते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.