शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करताना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Birsa Munda Krushi Kranti Yojana : शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. इतर जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना (Farmers) प्राधान्यक्रमाणे योजनांचा लाभ मिळावा, यासाठी वेगवेगळ्या नावांनी योजना तयार करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, कोणीही लाभधारक अनुदानापासून वंचित राहू नये, हा वेगवेगळ्या योजनांचा उद्देश असतो.