
shivaji maharaj
esakal
नवरात्र महोत्सव सर्वत्र सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना आपण नेहमी “जय शिवाजी, जय भवानी” असं म्हणतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची भवानीभक्ती समजून घेऊया. भवानी माता भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीवर अपार श्रद्धा होती. बखरीतही यासंदर्भात अनेक उल्लेख आढळतात. संकटसमयी भवानीदेवीने शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला, असंही म्हटलं जातं. प्रतापगडावरील श्रीभवानीची स्थापना हाच त्याचा प्रत्यय आहे.