सायबर गुन्हेगार कसे फसवतात? सोलापूरच्या १३ जण ६ कोटी रुपयाला फसले; ४२ लाख रुपयाला फसलेल्या एका आजीबाईंनी फिर्यादच दिली नाही; फसल्यावर तक्रार कोठे करायची, वाचा...

सायबर गुन्हेगारांनी या वर्षात सहा जणांना जादा नफ्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वापाच कोटींची तर तिघांना अटकेची भीती घालून डिजिटल ॲरेस्ट करून ७० लाखांची फसवणूक केली. दुसरीकडे, एका बड्या कुटुंबातील आजीबाईंना डिजिटल ॲरेस्ट करून सायबर गुन्हेगारांनी ४२ लाख रुपयांना फसविले. पण, त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिलीच नाही.
Cyber criminals

Cyber criminals

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सायबर गुन्हेगारांनी या वर्षात सहा जणांना जादा नफ्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वापाच कोटींची तर तिघांना अटकेची भीती घालून डिजिटल ॲरेस्ट करून ७० लाखांची फसवणूक केली. दुसरीकडे, एका बड्या कुटुंबातील आजीबाईंना डिजिटल ॲरेस्ट करून सायबर गुन्हेगारांनी ४२ लाख रुपयांना फसविले. पण, त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिलीच नाही.

समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून सायबर गुन्हेगार सावजाची चाचपणी करतात. त्यात अनेकांना सायबर गुन्हेगार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या अनुषंगाने आमिष दाखवतात. तर काहींना डिजिटल ॲरेस्ट करून त्यांच्याकडील रक्कम लुबाडतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सायबर पोलिसांनी वारंवार आवाहन केले, तरीदेखील फसणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. सायबर गुन्हेगारांचे फंडे समोरील व्यक्तींनी ओळखून त्यांच्या आमिषाला बळी पडू नयेत, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.

‘या’ ठिकाणी करावी तक्रार

  • आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या क्रमांकावर संपर्क करावा.

  • अन्य प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास १९४५ क्रमांकावर तक्रार नोंदवता येते.

  • www.cybercrime.gov यावर देखील तक्रार नोंदवता येते.

लक्षात ठेवाच, फसवणुकीचे फंडे असे...

  • नरेश गोयल खूप मोठा फ्रॉड असून, तुमच्या खात्यातून मोठी रक्कम ट्रान्स्फर केली आहे. तुमच्या आधारकार्ड, सीम कार्डवरून बेकायदेशीर कृत्य झाल्याचे सांगून सायबर गुन्हेगार भीती घालतात. त्यावेळी व्हॉट्‌सॲपवर सुप्रिम कोर्ट, ईडी, सीबीआयकडून नोटीस, अटक वॉरंट काढल्याची बनावट कागदपत्रे पाठवितात. तुम्हाला कधीही अटक होऊ शकते, अशीही भीती घालतात. व्हिडिओ कॉल करून स्वत: तयार केलेले बनावट पोलिस ठाणे, कोर्ट दाखवतात. तुम्हाला डिजिटल ॲरेस्ट केल्याचे सांगतात, पण अशावेळी न घाबरता थेट जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

  • शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा म्हणून अनोळखी क्रमांकावरून मोबाईलवर एक लिंक पाठवतात. त्यावर क्लिक करताच आपला क्रमांक सायबर गुन्हेगारांच्या इन्स्टाग्राम, टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये समाविष्ट होतो. त्या ठिकाणी अनेकजण, मला इतका नफा मिळाला, इतक्या दिवसांत एवढा फायदा झाला, अशी चर्चा करताना दिसतात. त्यावर विश्वास ठेवून अनेकांना पैसे गुंतविण्याचा मोह होतो आणि त्यातूनच फसवणूक होते. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यावर वैयक्तिक माहिती देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com