
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील गावागावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत रासायनिक व जैविकदृष्ट्या तपासण्यात आले आहेत. जैविक तपासणीत ३०७ गावातील स्रोतातील पाणी बाधित असल्याचे आढळले, पण टीसीएल पावडर टाकून पुन्हा तपासणी केली. त्यावेळी त्या स्रोतातील पाणी पिण्यायोग्य झाल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे रासायनिक तपासणीत ३७१ स्रोतातील पाणी पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे.