राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मुक्त चिन्हांमध्ये वाढ
राज्य निवडणूक आयोगाच्या १८ जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेनुसार ४८ मुक्त चिन्हे निश्‍चित करण्यात आली होती. त्यात आता ३० नोव्हेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार १४२ नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता १९० झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पक्ष (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (घड्याळ), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (हातोडा विळा व तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), काँग्रेस पक्ष (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी; तसेच धर्मनिरपेक्षवादी जनता दल (डोक्‍यावर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पक्ष (सायकल) अशी चिन्हे राखीव आहेत.

निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many registered political parties are there in the state