
Sanjay Raut : आत्तापर्यंत पत्रा चाळ प्रकरण चौकशीतून काय समोर आले?
शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते अशी ओळख असणाऱ्या संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडलीय. काहीवेळापूर्वीच संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. त्यानंतर ईडीनं याठिकाणी तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.(how much property of Sanjay Raut has been seized in ed red)
हेही वाचा: Sanjay Raut : ..तरीही शिवसेना सोडणार नाही; चौकशी सुरू असतानाच राऊतांचं ट्विट
आत्तापर्यंत एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.
आत्तापर्यंतच्या चौकशीतून काय समोर आले?
पत्राचाळीचा पुर्नविकास करण्याच्या उद्देशानं आर्थिक गैरव्यवहार झाला -म्हाडा आणि गुरु आशिष कंन्स्ट्रक्शनद्वारे एक करार करण्यात आला. करारानुसार विकासक गुरु आशिष कंन्स्ट्रक्शन 672 घरांचा पुर्ननिर्माण करणार होतं -पुर्नविकास झाल्यानंतर इतर जागा विकासक निर्माण करुन इतर जागेत बांधकाम करुन विक्री करणार होतं -मात्र विकासकानं 672 घरांचा पुर्नविकास करण्याऐवजी म्हाडाच्या डोळ्यात धूळ फेकली आणि 901.79 कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला .
पुर्नविकासाच्या जागेचा FSI 9 बिल्डरांना विकून 901.79 कोटी रुपये लाटण्यात आले. नंतर MEADOWS नावाचा आणखी एक प्रकल्प सुरु करुन 138 कोटी रुपये फ्लॅट खरेदीदारांकडून घेतले. बुकींग अमाऊंटच्या रुपात ही 138 कोटीची रक्कम गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं जमा केली -जवळपास 1039.79 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं तपासात समोर आले आहे.
प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये HDILकडून ट्रान्सफर -वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर केले -प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्या खात्यातून हा व्यवहार झाला आहे.
हेही वाचा: Sanjay Raut ED Live Updates: तीन पथकं, २५ अधिकाऱ्यांसह ईडीचा तपास सुरू
आत्तापर्यंत काय कारवाई झाली?
गुरु आशिष कंन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. प्रवीण राऊत हे या कंपनीचे माजी संचालक आहेत. 13 मार्च 2018 साली करण्यात आलेल्या तक्रारीनुसार राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि इतरांविरोधीत आरोप करण्यात आले होते.
एफआयआर नं. 22/2018 नुसार ईडीनं याप्रकरणी तपास आणि चौकशी केली होती. या कारवाईत प्रवीण राऊतांच्या पालघर, सफाळे, पडगा येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर वर्षा राऊतांचे दादारमधील घर तसेच वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी एकत्रित खरेदी केलेल्या किहिम किनाऱ्यावरील प्लॉट्स जप्त याआधी करण्यात करण्यात आलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले आहेत.
Web Title: How Much Property Of Sanjay Raut Has Been Seized In Ed Red
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..