उद्या दुपारी एक वाजता लागणार बारावीचा निकाल, 'इथे' पाहा तुमचा निकाल

सुमित बागुल
Wednesday, 15 July 2020

उद्या दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात  येणार आहे.

मुंबई - ज्या तारखेची सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक आतुरतेने वाट पाहत होते ती बारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झालीये. उद्या दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात  येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्यशासन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे. 

या वेबसाईट्स वर पाहा तुमचा निकाल 

वरील संकेतस्थळांवर बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. 

महत्त्वाची बातमी - सीबीएसईच्या दहावीच्या निकालात यंदाहीत मुलींचीच बाजी; पुणे विभागाचा निकाल 98.23 टक्के

दरम्यान परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना त्यांचे विषयनिहाय गुणांची प्रिंट घेता येणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थांना गुणपडताळणी करायची आहे त्यांना 17 जुलैपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी अंतिम मुदत 27 जुलै आहे. तर छायांकित प्रतिसाठी 17 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थांना अर्ज करता येणार आहे.

HSC results dates declared 12th results will be declared on 16th July 2020 at 1 pm


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC results dates declared 12th results will be declared on 16th July 2020 at 1 pm